Fri, Sep 21, 2018 03:45होमपेज › Pune › रहाटणी व पिंपरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

रहाटणी व पिंपरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Published On: Apr 26 2018 2:52PM | Last Updated: Apr 26 2018 2:52PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या दोन दिवसात 31 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईत रहाटणी कोकणे चौक येथील 30 पत्रा शेड व पिंपरीत रिव्हर रोड येथील 1 आर सी सी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. 

रहाटणी येथील प्रभाग क्र.28 कोकणे चौक परिसरातील अंदाजे 9 हजार चौरस फुटांची 30 पत्राशेड बांधकामे काढून टाकण्यात आली. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ड प्रभागाच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. 3 जेसीबी ,1 डंम्पर ,1 कंटेनर ,10 मजूर ,पालिकेचे 20 अधिकारी,15 पालिका पोलीस ,35 स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली 

पिंपरीत प्रभाग क्र 21मध्ये रिव्हर रोड परिसरातील 900 चौ फुटांचे 1 आरसीसी बांधकाम पाडण्यात आले बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ग प्रभागाच्या पथकाने ही कारवाई केली 1 ब्रेकर ,7 मजूर ,पालिकेचे 10 अधिकारी ,पालिकेचे 10 पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Tags : Action, unauthorized constructions, pimpari, rahatani, pune news