Sat, Nov 17, 2018 19:19



होमपेज › Pune › चार देशी कट्ट्यांसह तिघांना अटक

चार देशी कट्ट्यांसह तिघांना अटक

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 1:06AM

बुकमार्क करा




पुणे : प्रतिनिधी 

दहशतवादविरोधी पथकाने शनिवार पेठेतील वर्तक आश्रम येथे आलेल्या तिघांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार देशी कट्टे आणि सहा काडतुसे जप्त केली. राजू आरमोगम पिल्ले (वय 38, रा़ बोपोडी), प्रवीण ऊर्फ पमी भगवान पवार (वय 34, रा़ वारजे) आणि जितेंद्र आनंद सोनवणे (वय 31, रा़ देशमुखवाडी, सदाशिव पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ 

दहशवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेतील वर्तक आश्रम येथे तिघे जण शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पुणे एटीएसला मिळाली़ होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता पोलिसांनी तेथे सापळा लावला़. 

हे तिघे आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर राजू पिल्ले याच्याकडे 3 पिस्तुल व 4 काडतुसे सापडली तर, प्रवीण पवार याच्याकडे एक पिस्तुल आणि जितेंद्र सोनवणे याच्याकडे 2 काडतुसे मिळाली़.  त्यानंतर एटीएसच्या पथकाने तिघांनाही अटक केली. 

तिघांपैकी प्रवीण पवार याच्याविरुद्ध मारामारी, शस्त्रे बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले़  तर तिघांवर एटीएसच्या काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.