Wed, Nov 21, 2018 15:25होमपेज › Pune › महाबँक अधिकार्‍यांवर कारवाई; चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाबँक अधिकार्‍यांवर कारवाई; चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रवींद्र मराठे यांच्यासह आजी-माजी पदाधिकार्‍यांवर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बँकिंग क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारी बँकांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. पोलिसांची कारवाई अयोग्य असल्याने अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणावर अन्याय होता कामा नये. त्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.