Fri, Nov 16, 2018 23:27



होमपेज › Pune › बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या 25 वाहनांवर कारवाई 

पुणे : बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या 25 वाहनांवर कारवाई 

Published On: Jan 06 2018 6:54PM | Last Updated: Jan 06 2018 6:54PM

बुकमार्क करा




पुणे : प्रतिनिधी 

पीएमपीच्या येरवडा ते वाघोली या बीआरटी मार्गावर घुसखोरी करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे काम सुरू झाले असून,पाच जानेवारीपर्यत सुमारे 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये  20 दुचाकी, पाच चारचाकी वाहने आहेत. कारवाई केलेल्या वाहनांमध्ये  दोन शासकीय वाहनांचा समावेश  आहे .त्यापैकी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. सोमवारपासून वाहनांवर अधिक जोमाने कारवाई करण्यात येणार असून,संबधित वाहने जप्त करण्यात येणार आहेत. अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितली.

शहरातील प्रवाशांना जलद,सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुक बस सेवा उपलब्ध करण्याच्या हेतुने बारआरटी मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान या बीआरटी मार्गातून रूग्णवाहिका सोडून इतर खासगी वाहनांना प्रवेश करण्यास परवानगी नाही. खासगी वाहने बीआरटी मार्गातून जाऊ  नयेत , यासाठी बीआरटी मार्गावर पीएमपीच्यावतीने वॉर्डन नियुक्त करण्यात आले  आहेत. मात्र कित्येक वाहनचालक वॉर्डनला धक्कबुक्की तसेच शिवीगाळ प्रसंगी मारहाण करून नियमबाह्यपणे मार्गातून वाहने चालवित असल्याचे प्रकार घडत आहेत. काही मार्गावर वॉर्डनला गंभीर दुखापत सुध्दा झालेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन पीएमपीचे व्यावस्थापकीय संचालक  मुंढे यांनी बीआरटी मार्गातून घुसखोरी करणा-या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार येरवडा ते वाघोली या बीआरटी या मार्गावर पाच जानेवारीपर्यत  पीएमपीचा सुरक्षा विभाग, वाहतुक पोलिस यांनी संयुक्तपणे सलग काही दिवस रात्री 8 ते पाऊणे दहा वाजेपर्यत कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  दरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात वाहनांमध्ये दोन शासकीय वाहनांचा समावेश आहे तर 25 वाहनांपैकी पाच वाहने जप्त करण्यात आली आ हेत.

याबाबत माहिती देताना मुंढे म्हणाले,“ बीआरटी मार्गातून घुसखोरी करणा-या वाहनांवर आता सोमवारपासून अधिक जोमाने कारवाई करून, ती जप्त करून वाहनचालकांवर फौजदारी कारवाई करण्यत  येणार आहे. त्यानंतर जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहेत.