Sat, Feb 23, 2019 10:11होमपेज › Pune › नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई

नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई

Published On: Feb 13 2018 8:40PM | Last Updated: Feb 13 2018 8:40PMपिंपरी : प्रतिनिधी 

पुणे येथे मांज्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर पिंपरी-चिंचवड शहरात मांज्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले. यामुळे पोलिसांनी आता मांजाविक्री करणार्‍यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. वाकड पोलिसांनी डांगे चौकातील दुकानातून एक हजार २१५ रुपयांचा मांजा जप्त केला आहे.

डांगे चौकातील क्लासिक स्टेशनरीमध्ये हा मांजा सापडला आहे. पोलिसांनी रताराम रघुनाथराम सोळंकी (३७, रा. विशालनगर, वाकड) आणि चंपालाल रघुनाथ सोळंकी (३४) या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे.