Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Pune › इमारत गळतीप्रकरणी दोषींवर कारवाई : बापट

इमारत गळतीप्रकरणी दोषींवर कारवाई : बापट

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या विस्तारित नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात उपराष्ट्रपतींसमोरच पावसाने झालेल्या गळतीचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे घाईगडबडीत उद्घाटनाचा कार्यक्रम घेणार्‍या पालिकेतील सत्ताधारी भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.पुणे महापालिकेतील गळतीच्या विषयावर पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना दाखल झाली होती, त्यावरील  चर्चेनंतर बापट पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गळतीच्या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल  तातडीने पाठविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. 

घुमटाकार छतातून पाण्याची गळती तेव्हाही झालेली नव्हती आणि आताही होत नाही. गळतीचा हा सर्व परिसर अभियंत्याकडून तपासण्यात येत आहे. त्यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. 
इमारत अर्धवट असतानाही पालिकेतील पदाधिकार्‍यांनी उद्घाटनाची घाई केली. त्यामुळे सत्ताधार्‍यांना टीकेला समोरे जावे लागले होते.  पालकमंत्र्यांच्या इशारामुळे स्थानिक भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.