Mon, Feb 18, 2019 05:25होमपेज › Pune › द्रुतगती मार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात

द्रुतगती मार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 12:58AMलोणावळा :  वार्ताहर

पुणे मुंबई एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटात खोपोलीच्या हद्दीत शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघात झाला. यात चार कार,  एक कंटेनर व एक ट्रेलर एकमेकांवर आदळून दोनजण जखमी झाले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

पुण्याहून मुंबईला रंग घेऊन जाणार्‍या ट्रेलरच्या चालकाचे तीव्र उतार आणि  वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर पुढच्या सुझुकी कारवर आदळली. त्या पुढे असणार्‍या आणखी तीन कार आणि एक कंटेनर एकमेकांवर आदळले.