Fri, Apr 26, 2019 03:36होमपेज › Pune › छत्रपतींच्या पुतळ्याबाबत पालिकेस कला संचालनालयाचा अभिप्राय प्राप्‍त

ब्राँझच्या पुतळ्याची किंमत ३१ लाख

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:24AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड प्रतिकृती पुतळा सुशोभीकरण करून बसविण्यात येणार आहे. याबाबत कला संचलनालय मुंबई यांच्यामार्फत पुतळ्याची योग्य किंमत मिळण्यासाठी पालिकेने संचलनालयाकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार शिवाजी महाराज यांच्या ब्राँझमधील सिंहासनाधिस्थ पुतळ्याची अंदाजे किंमत 31 लाख असल्याचे पत्र कला संचालनालयाकडून पालिकेस प्राप्त झाले आहे 

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या  पाठपुरवठ्यामुळे कलासंचनालय मुंबई यांनी हा पुतळा साधारणपणे 2.00 बाय 1.80 बाय 2.50 मी. एवढ्या आकारमानाचा असून, अंदाजे वजन 1100 किलो भरण्याची शक्यता असल्याचे तसेच या पुतळ्याची अंदाजे किंमत 31 लाख रुपये  असल्याचे पत्रानुसार पालिकेला कळविले आहे.कार्यकारी अभियंता स्थापत्य ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी यांना हे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

पालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील सिंहसनास्थ (रायगड प्रतिकृती) पुतळा व त्यावरील मेघडंबरीची योग्य वाजवी किंमत मिळण्याबाबत कला संचालनालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार सर ज.जी.कला महाविद्यालय यांच्याकडून अभिप्राय घेण्यात आला. मेघडंबरीचे काम सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कामाशी संबंधित असल्याने त्याबाबत या कार्यालयाकडून अभिप्राय देणे शक्य होत नाही. तथापि पुतळ्याचे वजन 1100 किलो भरण्याची शक्यता असल्याचे तसेच या पुतळ्याची अंदाजे किंमत 31 लाख रुपये एवढी असल्याचे पत्रानुसार पालिकेला कळविले आहे; असे वाघेरे यांनी सांगितले.