Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Pune › ४ देशी कट्ट़्यांसह तिघांना एटीएसकडून अटक

४ देशी कट्ट़्यांसह तिघांना एटीएसकडून अटक

Published On: Jan 11 2018 9:54PM | Last Updated: Jan 11 2018 9:54PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

दहशतवादविरोधी पथकाने शनिवार पेठेतील वर्तक आश्रम येथे आलेल्या तिघांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४ देशी कट्टे आणि ६ काडतुसे जप्त केली. राजू आरमोगम पिल्ले (वय ३८, रा़ बोपोडी), प्रवीण ऊर्फ पमी भगवान पवार (वय ३४, रा़ वारजे) आणि जितेंद्र आनंद सोनवणे (वय ३१, रा़ देशमुखवाडी, सदाशिव पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़

दहशवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेतील वर्तक आश्रम येथे तिघे जण शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पुणे एटीएसला मिळाली़ होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता पोलिसांनी तेथे सापळा लावला़. हे तिघे आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर राजू पिल्ले याच्याकडे ३ पिस्तुल व ४ काडतुसे सापडली तर, प्रवीण पवार याच्याकडे १ पिस्तुल आणि जितेंद्र सोनवणे याच्याकडे २ काडतुसे मिळाली़. 

त्यानंतर एटीएसच्या पथकाने तिघांनाही अटक केली तिघांपैकी प्रवीण पवार याच्याविरुद्ध मारामारी, शस्त्रे बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले़ तर तिघांवर एटीएसच्या काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.