Sat, Mar 23, 2019 16:50होमपेज › Pune › येरवडा कारागृहातील कैद्यांची 'एम्स'च्या डॉक्टरांनी केली तपासणी

येरवडा कारागृहातील कैद्यांची 'एम्स'च्या डॉक्टरांनी केली तपासणी

Published On: Jul 13 2018 4:19PM | Last Updated: Jul 13 2018 4:19PMपुणे : प्रतिनिधी  

औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात 'एम्स'च्यावतीने गुरूवारी येरवडा कारागृहात विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ ते दुपारी दीड या वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून येथील सुमारे २५० कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या तपासणीत प्रामुख्याने रक्तदाब, रक्तातील शर्करा, तसेच अन्य नियमित तपासण्या करण्यात आल्‍या. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने येथील कैद्‍यांमध्ये त्वचा विकाराचे प्रमाण अधिक असल्याचे या तपासणीत डॉक्टरांना जाणवले.

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे  यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तुरुंग अधिकारी उत्तम पवार यांच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आले होते. गोकुळ गायकवाड, अनिरूद्ध सप्रे, डॉ. मानसी पवार, डॉ. किशोर तात, डॉ. पल्लवी राजपूत, संकेत गायकवाड, लोवेलीना कसबे, सचिन गुप्ते, सुवर्णा शिंदे अशा आठ जणांच्या पथकाने हे शिबीर यशस्वी केले.

यापुढेही अशाच प्रकारची शिबिरे घेऊन समाजात दुर्लक्षीत असलेल्या घटकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन या वेळी उत्तम पवार यांनी केले. त्याला 'एम्स'च्या चमूने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.