Tue, Jun 25, 2019 13:31होमपेज › Pune › भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चिट 

भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चिट 

Published On: May 01 2018 11:23AM | Last Updated: May 01 2018 12:02PMपुणे : पुढारी ऑनलाईन

भोसरी जमीन खरेदी प्रकणावरून महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना एसीबीकडून क्‍लीन चीट देण्यात आली आहे. पुणे कोर्टात आज एसीबीने आपला अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात खडसे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्‍याचे एसीबीने म्‍हटले आहे.  

एकनाथ खडसे यांनी आपल्‍या पत्‍नीच्या नावे भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केला होता. या प्रकरणी पुणे एसीबी तपास करीत होती. मात्र, एसीबीने सादर केलेल्‍या आजच्या अहवालात म्‍हटले आहे की, खडसे यांनी खरेदी केलेल्‍या भूखंडामुळे सरकारचे कोणत्‍याही प्रकारे नुकसान झाले नाही. 

काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी पुणे येथील भोसरी एमआयडीसीतील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नावाच्या जमीनमालकाकडून ३. ७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये होत आहे. मात्र, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. 

महसूलमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीच रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी केल्यामुळे संशय निर्माण झाला होता. विरोधकांनी या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पुणे एसीबी खडसेंची चौकशी करत होते. या प्रकरणावरून ४ जून २०१६ ला खडसे यांनी आपल्‍या महसूल मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Tags : Bhosari land scam, BJP leader Eknath Khadse, ACB