Sat, Nov 17, 2018 18:37होमपेज › Pune › पालिकेच्या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक

पालिकेच्या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:05AMखडकवासला : धायरी येथील  मनपाच्या  पोकळे शाळेत अपुरे शिक्षक असल्याने शेकडो  विद्यार्थ्यांची हेंडसाळणा सुरू आहे. माध्यमिक शाळेतील नवीन व दहावीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांना   एकत्र एकाच वर्गात शिकवले जात आहे. विद्यार्थ्यांना  बसण्यासाठी पुरेशी बॅच, तर प्राथमिक शाळेतील सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाही एकाच वर्गात एकच शिक्षक शिकवत आहेत.

विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत  नाहीत. पुरेसे शिक्षक आहेत. याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अपुरे शिक्षक, अपुर्‍या वर्ग खोल्या तसेच बाकड्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक कसे बसे शिकवत आहेत. मुलांच्या शाळेत मुख्याध्यापकांसह चार शिक्षक कमी आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत  544  मुले आहेत. तर मुलींच्या शाळेत तीन शिक्षक कमी आहेत. एकच शिक्षक एकाच वेळी दोन वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतात. स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे म्हणाले, प्राथमिक शाळेत अपुरे शिक्षक असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. तातडीने पुरेस शिक्षक द्यावे यासाठी वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.