Wed, Jul 17, 2019 10:47होमपेज › Pune › ‘झील’मध्ये भारताच्या नकाशाची प्रतिकृती

‘झील’मध्ये भारताच्या नकाशाची प्रतिकृती

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 27 2018 11:46PMधायरी : वार्ताहर

सिंहगड रोड परिसरातील नर्‍हे येथील झील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताच्या नकाशाची प्रतिकृती तिरंगी झेंड्याच्या रंगामध्ये सादर केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमातून समाजाला राष्ट्रभक्तीचा, समतेचा, एकतेचा व अखंडतेचा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. मानवता व एकता हा संदेश देण्यासाठी झीलच्या अठराशे विद्यार्थांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार करून भारत देशाचा नकाशा तिरंगी झेंड्याच्या तीन रंगामध्ये तयार केला. 

या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त व ए.टी.एस. प्रमुख पुणे भानूप्रताप बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यक्ती ते व्यक्ती समाज ते समाज, समाज ते राष्ट्र यांना एकत्र आणण्याचा भारतीयत्व हा एक धागा आहे. जात धर्मा शिवाय फक्त भारतीय लिहायला शिकण्याची भावना प्रत्येक नागरीका मध्ये असायला हवी असे विचार या वेळी बर्गे यांनी व्यक्त केले. 

झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रा. जयेश काटकर यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी देशामध्ये जाती भेदात माणसे विभागली जात आहेत. समाजा समाजाध्ये तेढ निर्माण होत आहे याची मोठी खंत वाटते. स्वामी विवेकानंद आणि शहीद भगत सिंग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माणुसकी हीच जात आणि देश हाच धर्म या तत्वाला अनुसरून झील युथ क्लब ची स्थापना केली आहे. 

या वेळी प्रा. वीरेश चपटे, प्रा. सचिन वाडेकर, डॉ. संजय देवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.