Wed, May 22, 2019 22:47होमपेज › Pune › गुलटेकडी येथील गोल्डन बेकरीला भीषण आग

गुलटेकडी येथील गोल्डन बेकरीला भीषण आग

Published On: Dec 04 2017 12:49PM | Last Updated: Dec 04 2017 12:49PM

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी

गुलटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील प्रसिद्ध गोल्डन बेकरीला आज (सोमवारी) १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या ७ फायर गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. 

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.