Tue, May 21, 2019 22:49होमपेज › Pune › फुटपाथवर झोपलेल्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

फुटपाथवर झोपलेल्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी 

फुटपाथवर झोपलेल्या नागरिकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. आळंदी रोडवरील पवार पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला आहे. दरम्यान खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

अशोक नामदेव भगतउर्फ काची सिंकदर (वय 30, रा. रमाबाई आंबेडकरनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. डोक्यात सिंमेटचा ब्लॉक घालून खून करण्यात आला आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विशाल किसन राठोड उर्फ धुम विशल्या (वय 22, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) याच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदंर्भात निलेश उर्फ लखन कांबळे (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृृत अशोक हा याच परिसरात कचरा तसेच भंगार गोळाकरून ते विक्री करत असे. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो शिवीगाळ करत असे. दिवस भंगार गोळा केल्यानंतर रात्री फुटपाथवरच झोपत असे. दरम्यान, बुधवारी सकाळी आळंदी रोडवरील मच्छिमार्केट शेजारी असणार्‍या पवार पेट्रोल पंपाजवळ फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडली असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सुररुवातीला मृताची ओळख पटली नव्हती.

मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे माहिती घेतल्यानंतर तत्याचे नाव अशोक भगत असल्याचे समोर आले.   अशोक भगत याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर ते शिवीगाळ करत असे. रात्रीही त्यांनी शिवीगाळ केली असावी, त्यातूनच त्यांचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी त्यात कैद झाला होता. त्यावरून पोलिसांनी विशाल राठोड उर्फ धुम विशल्या असल्याची माहिती मिळाली. तो पसार झाला  आहे. भगत यांचे नातेवाईक याच परिसरात राहण्यास आहेत. त्यांना माहिती दिली आहे.