Sat, Feb 16, 2019 10:43होमपेज › Pune › जॅमरसह कार पळविली

जॅमरसह कार पळविली

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी 

रस्त्यावर धोकादायकरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जॅमर लावल्यानंतर कारचालक व मालक जॅमरसह कार घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मगरपट्टा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक व मालक दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस नाईक विशाल भोई (हडपसर वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भोई हे हडपसर वाहतूक विभागात काम करतात. मगरपट्टा रोडवर धोकादायकरित्या  पार्किंग केलेल्या वाहनांवर शुक्रवारी हडपसर वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू होती. त्यावेळी मगरपट्टा मेन गेटजवळ एमएच 12 क्यूजी 1489 ही  चारचाकी धोकादायकरित्या  पार्क केलेली त्यांना आढळली. त्यानंतर त्यांनी वाहनाला पिवळ्या रंगाचा लोखंडी खेकडा जॅमर लावला. काही वेळानंतर ते तेथे आल्यावर कारचा चालक व मालक यांनी वाहनाला लावलेला जॅमर काढून कार घेऊन तेथून पोबारा केल्याचे समोर आले. यासंदर्भात भोई यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हादाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.