Tue, Jul 23, 2019 17:23होमपेज › Pune › संसदेत चार वर्षात 935 प्रश्न

संसदेत चार वर्षात 935 प्रश्न

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी

लोकसभेचा सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत 935 तारांकित व अतारांकित प्रश्न मांडले; तसेच 255 वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला, तर 16 महत्वाच्या विषयांवर खासगी विधेयके मांडली. लोकसभेतील आपली एकूण उपस्थिती 94% राहिली मतदार संघातील महत्वाची कामे मार्गी लावली पिंपरी व पनवेल येथे पासपोर्ट सेवा केंद्रास मंजुरी, ग्राम जोती योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील तुंगी, डोंगरपाडा या दूर्गम आदिवासी भागात केलेला वीज पुरवठा, पुणे लोणावळा तिसर्‍या व चौथ्या नवीन रेल्वे ट्रँकसाठी पाठपुरावा, पनवेल ते उरण जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करण्यास मंजुरी या कामांचा समावेश असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

चार वर्षातील आपल्या कामाचा लेखाजोखा बुधवारी (दि. 16 ) खा. बारणे यांनी मांडला मावळ मतदारसंघातील व देशातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले संसदेतील उत्कुष्ट कामाबद्दल प्राईम पॉईंट फाउंडेशन चेन्नईच्या वतीने सलग तीनवेळा  संसदरत्न पुरस्कार  मिळाला याचा त्यांनी आवर्जु उल्लेख केला.मावळ मतदारसंघात अनेक विकास कामे केली. पुणे- लोणावळा तिसर्‍या व चौथ्या नवीन रेल्वे ट्रँकसाठी केलेला पाठपुरावा, तळेगाव ते चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग क्र.55 यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून केंद्र सरकारकडून मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.  पिपंरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणात साठलेला गाळ सातत्याने तीन वर्ष काढून घेतला. त्यामुळे पाण्याचा साठा वाढल्याने भर उन्हाळ्यातही पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपात होणार नाही, असा दावा बारणे यांनी केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून सातत्याने पाठपुरावा केला आहे.

मराठा आरक्षण मुद्दा सर्वप्रथम लोकसभेत मांडला, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे हा तारांकित  प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. कार्ला, भाजे, एलिफंटा लेणी तसेच रायगड, विसापूर, लोहगड, राजमाची, तुंग, तिकोना या किल्यांच्या संवर्धनासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाठपुरावा केला, पिंपरी येथील हिंदुस्तान एन्टीबायोटिक कंपनी पुनर्निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून 100 कोटीस मंजुरी, माथेरान येथील ऐतिहासिक मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असताना प्रयत्न करून पुन्हा मिनी ट्रेन चालू केली व तेथील मार्गाची दुरुस्ती व नवीन इंजिन घेण्यासाठी केंद्रसरकारकडून मोठी तरतूद केली, क्रांतिविर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यासाठी पाठपुरावा केला. लवकरच त्यांच्या नावाचे तिकीट प्रकाशित होणार आहे, संरक्षण खात्याशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री यांची भेट घेवून रेड झोन व मावळमधील मिसाईल प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमीनींना योग्य मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा केला. शेतकर्‍यांस मोबदला न देता औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेले मावळ तालुक्यातील 732 हेक्टर क्षेत्र वगळण्याचा महत्वपुर्ण निर्णय आपल्या प्रयत्नामुळे झाला आहे, पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या अनाधिकृत बांधकाम व शास्तिकराच्या प्रश्ना संदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. असे खा. बारणे यांनी म्हटले आहे.