Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Pune › ९० टक्के ‘स्मार्ट’ प्रकल्प कागदावरच

९० टक्के ‘स्मार्ट’ प्रकल्प कागदावरच

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:33AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत गेल्या दीड वर्षात कंपनीकडून प्रस्तावित करण्यात प्रकल्पांपैकी तब्बल 90 टक्के प्रकल्प प्रलंबित आहेत. कंपनीकडून प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे जे प्रगती पुस्तक (स्कोअरकार्ड) संचालक मंडळापुढे सादर करण्यातआले आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे संचालक मंडळाची बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल)ची संचालक मंडळाची बैठक सोमवारी (दि. 4) होत आहे. मंडळाच्या गत बैठकीत या योजनेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच, गेल्या दीड वर्षात झालेल्या योजनांच्या कामकाजाचे प्रगतीपुस्तक पुढील बैठकीत सादर करण्याची सूचना सदस्यांनी केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटी योजनेच्या गेल्या दीड वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोख्यासंबधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यात स्मार्ट सिटी योजनांचे काम कसे संथगतीने सुरू आहे, हे त्यातून समोर आले आहे.

कंपनीकडून जानेवारी ते मार्च 2016 आणि एप्रील ते जून 2017 या सहा महिन्यांचे प्रगती आढावा संचालक मंडळासमोर ठेवला आहे. त्यात औंध-बाणेर-बालेवाडी या एबीबी एरियाससोबतच शहरासाठी जे  53 प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते, त्यामधील अवघ्या 6 प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तर, अन्य प्रकल्प अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. नदी सुधारणा प्रकल्प, वाहतूक सुधारणा प्रकल्प, समान आणि पुरेसा पाणी पुरवठा प्रकल्प, वाहतूक नियोजन प्रकल्प, ई-रिक्षा, बीआरटी, ई बस, ट्रान्झीट हब, तसेच पॅनसिटी प्रकल्प अर्धवट तसेच काही प्रकल्प अद्याप सुरुच झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कंपनीचे काम संथगतीने सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.