Tue, Jul 16, 2019 13:45होमपेज › Pune › ७०३ आढळले पॉझिटिव्ह

नऊ लाख जणांची ‘स्वाइन फ्लू’साठी तपासणी

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:20AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

शहरात यावर्षी आतापर्यंत सुमारे नऊ लाख स्वाइन फ्लू असलेल्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 703 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर सध्या एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.

गुरुवार, दि. 28 डिसेंबर रोजी शहरातील 50पेक्षा अधिक स्क्रीनिंग सेंटरवर तीन हजार 374 रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी स्वाइन फ्लूचा संशय असलेल्या 38 रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले, तर चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले.

मात्र, यापैकी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळेला नाही. त्याचप्रमाणे आतापर्यंत पुण्यात आठ लाख 95 हजार 84 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 25 हजार 943 संशयित रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले आहे, तर तीन हजार 220 जणांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

यापैकी 703 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर त्यापैकी 552 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून, त्यांची सुटी करण्यात आली आहे, तर 125 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.