Tue, Nov 13, 2018 23:51होमपेज › Pune › अबुधाबीत आठवे विश्व मराठी साहित्य संमेलन  

अबुधाबीत आठवे विश्व मराठी साहित्य संमेलन  

Published On: May 10 2018 3:10PM | Last Updated: May 10 2018 3:10PMणे : प्रतिनिधी

आठवे विश्व मराठी साहित्य संमेलन अबुधाबी येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेतर्फे मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी या संमेलनाचे आयोजन गेल्या सात वर्षांपासून करण्यात येत आहे. 

'भारताचे संरक्षण व अंतर्गत सुरक्षा' हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले लाभले आहेत, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड, सल्लागार श्रीपाद जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष भूषण गोखले, स्वागताध्यक्ष सुरेश खोपडे उपस्थित होते. या संमेलनाचे उद्घाटन निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे करणार असून स्वागताध्यक्ष म्हणून निलेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, मॉरिशस, भूतान आणि इंडोनेशिया येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags : 8th vishwa Marathi Sahitya Sammelan, abu dhabi, pune