Sat, Jan 19, 2019 01:52होमपेज › Pune › धक्कादायक! आई रागावल्याने आठवीतील मुलीची आत्महत्या 

आई रागावल्याने आठवीतील मुलीची आत्महत्या 

Published On: Apr 14 2018 10:53AM | Last Updated: Apr 14 2018 10:53AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी - चिंचवड परिसरातील काळेवाडी येथे धक्कादायक घटना घडली. आई रागवल्याच्या कारणावरुन आठवीची परीक्षा दिलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. सेजल दोरास्वामी मुदियाल (१४, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेजलच्या परिक्षा संपल्या होत्या. ती आई वडिलांसोबत गावी जाणार होती. दरम्यान आईने घरातील साफ सफाई काढली होती. त्यावेळी थोड़ी मदत करायला सांगितले. मात्र सेजल हिने सांगितलेले काम न केल्याने आई तिला ओरडली. या रागातुन तिने बेडरूम मध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

Tags : suicide, school girl, pune,