Sat, Jul 20, 2019 09:18होमपेज › Pune › निगडी ओटास्किममधून ४ पिस्तूलांसह ८ जिवंत काडतुसे जप्त

पुणे : निगडीत ४ पिस्तूलांसह ८ जिवंत काडतुसे जप्त

Published On: Aug 26 2018 4:02PM | Last Updated: Aug 26 2018 4:02PMपिंपरी : प्रतिनिधी 

निगडी येथील ओटास्किममध्ये विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे ४ पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि.२५ ) सकाळी दहाच्या सुमारास ही धडाकेबाज कामगिरी केली. 

अनुप नवनाथ सोनवणे (२८,रा. ओटास्किम, निगडी ) यास विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला निगडी येथील ओटास्किम परिसरात एका तरुणाने विक्रीसाठी ४ पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे आणल्याची पक्की खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला. यावेळी त्याने घरात लपवून ठेवलेली ४ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख १९ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास सहायक पोलिस गणेश निरीक्षक पाटील करीत आहेत.