पिंपरी : प्रतिनिधी
अमेरिकेतील मुलीकडे गेलेल्या वडिलांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी पिंपळे निलख येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी विशाल गोवर्धन पटेल (३२, रा. द्वारकामाई वंडर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पटेल यांचे मामा पिंपळे निलख येथे राहतात. जानेवारी महिन्यामध्ये विशाल यांचे मामा आपल्या मुलींकडे अमेरिकेमध्ये गेले आहेत. यामुळे विशाल हे कधीतरी मामांच्या घरी येत-जात असे. ३ ते १३ एप्रिल या दरम्यान विशाल यांच्या मामाचे घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचा दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, असा एकूण आठ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तपास सांगवी पोलिस करत आहेत.
Tags : Theft, Crime, Pune, Police