Sat, Apr 20, 2019 10:13होमपेज › Pune › शेतकरी उत्पादक कंपन्यांचे  ८.८५ कोटींचे सामंजस्य करार

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे  ८.८५ कोटींचे सामंजस्य करार

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:24AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) 29 शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत 29 हजार किंवटल शेतमालाचे 8 कोटी 85 लाखांचे सामंजस्य करार नुकतेच करण्यात आले. कृषी महोत्सवात शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन कृषी महाविद्यालयात झाले. त्यामध्ये हे करार करण्यात आल्याची माहिती एमएसीपीच्या अधिकार्‍यांनी दिली.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना व खरेदीदारांना उत्पादित कृषी मालाची थेट खरेदी-विक्री करता यावी या उद्देशाने एकदिवसीय राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन 13 मार्च रोजी झाले. त्यास 240 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 457 प्रतिनिधी, 35 खरेदीदार, प्रक्रियादार व निर्यातदारांनी भाग घेतला होता. त्यामध्ये हे करार करण्यात आले असून, त्यामध्ये  भाजीपाला, फळे, कडधान्ये, तेलबियांचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खरेदीदार यांच्यासाठी राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन हे महत्त्वाचे व्यासपीठ राहिलेले आहे. मध्यस्थांची साखळी तोडून शेतकर्‍यांनी एकत्र येऊन कंपनीद्वारे स्वतःच माल विक्रीत उतरावे. त्यांना प्रोत्साहन देऊन बॅ्रण्डिंगने थेट विविध कंपन्या, प्रक्रियादार यांना त्यांच्या मालाची विक्री करावी व जास्तीत जास्त फायदा मिळवावा, यासाठी प्रकल्पाद्वारे काम केले जात आहे. 

ब्रॅण्डिंगद्वारे माल विक्रीने उलाढालीत वाढ

कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, तथा ‘आत्मा’ यांच्यामार्फत उत्पादित मालाचे शेतकरी कंपन्यांमार्फत  बॅ्रण्डिंगद्वारे मालविक्रीस प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच खरेदीदारांनाही शेतकर्‍यांच्या कंपन्यांकडून मुबलक प्रमाणात मालपुरवठा होत असल्याने उलाढाल वाढण्यास मदत होत आहे.

 

Tags : pune, pune news, farmer, farmer manufacturing companies, Agreement,