होमपेज › Pune › पुणे : ई-मेल आयडी हॅक करुन ७२ हजार लुटले

पुणे : ई-मेल आयडी हॅक करुन ७२ हजार लुटले

Published On: Apr 14 2018 11:46AM | Last Updated: Apr 14 2018 11:44AMपिंपरी : प्रतिनिधी 

हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा ई मेल आयडी हॅक करुन हजारोंना गंडा घातला आहे. उत्तरप्रदेशातील टोळीने बँक खात्यातून ७२ हजार ७०६ रूपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संतोषकुमार प्रकाशराव ब्रह्मराऊत (३२, रा. नेरे दत्तवाड़ी, मूळशी) याने फिर्याद दिली आहे. तर महमद नजिम , गोपाल दास आणि महमद असमल (सर्व रा. उत्तरप्रदेश) व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Tags :pune, pune news. online fraud