Wed, Feb 20, 2019 12:44होमपेज › Pune › पुणे : बलात्कारप्रकरणी ७० वर्षीय वृद्धाला अटक

पुणे : बलात्कारप्रकरणी ७० वर्षीय वृद्धाला अटक

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:05AMउरुळी कांचन ः वार्ताहर 

अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुलीच्या घराशेजारी राहणार्‍या 70 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी बुधवारी (दि. 31) पोलिसांनी अटक केली आहे. घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधून मुलीला खाऊ देऊन मुलीवर व्यभिचारी नराधम वृद्धाने बलात्कार केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

एकनाथ महादेव खेडेकर (वय 70, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे. संबंधित वृद्धाने पीडित कुटुंबीयांशी ओळखीचा गैरफायदा घेऊन आपला हव्यास पूर्ण करण्यासाठी कुटूंबातील सदस्य घराबाहेर असताना पाशवी कृत्य साधले आहे. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर वैद्यकीय तपासात मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याने सोमवारी (दि. 22 जानेवारी) हा प्रकार उघडकीस आला होता.पोलिसांनी घटना घडल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून गुन्हयाचा उलगडा करण्यासाठी या वस्तीत तळ ठोकला होता. अत्याचार झालेल्या मुलीला विश्‍वासात घेऊन मुलीच्या खुणांवरून शेजारील वृद्ध याच्यावर संशय केला गेला होता. पोलिसांनी तपासात निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी सर्व बाजूंनी कसून तपास केला होता. पोलिसांना आरोपीविरोधात भक्कम धागेदोरे हाती लागल्यानंतर या वृद्ध आरोपीला बुधवारी (दि. 31) अटक केली आहे.