Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Pune › वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांना मुंढेंचा दणका

वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांना मुंढेंचा दणका

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:45PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये काम करणार्‍या 660 कर्मचार्‍यांच्या बदल्या व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत. 

मुंढे यांनी पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यापर्यंत काम केले. पीएमपी बसच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या अनेक कर्मचार्‍यांकडून कामकाजात कोणतीही सुधारणा दिसत नव्हती. तसेच वाहक, चालकांना स्टार्टर, लाईटमन, रिपेअरिंग यासारखी इतर कामे देण्यात आली होती.

त्यामुळे त्यांच्या बदल्या केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच एकाच ठिकाणी काम करणारे हे कर्मचारी तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मर्जीत राहून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती. पर्यायाने पीएमपीचा आर्थिक बोजा वाढतच चालला होता. त्यामुळे मुंढे यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्राधान्य दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंढे यांनी मागील सहा महिन्यात नऊशेच्यावर कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. सातशेच्या आसपास बदल्या या तीन चार दिवसांत केल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच पदावर काम करत असलेल्या चालक वाहक, लिपिक, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक, मदतनीस, फिटर, क्लिनर, मॅकेनिक, अशा अनेक पदांवरील कर्मचार्‍यांचा यात बदल्यांमध्ये आहे.

मुंढे साहेबांनी चर्चेतून कामगारांच्या समस्या सोडवाव्यात : खराडे

पीएमपी प्रशासनातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना आहेत. मात्र, या बदल्या करताना मुंढे साहेबांनी कर्मचार्‍यांचे म्हणणे ऐकूण घेतले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. कामगारांच्या म्हणणे ऐकूण नाही घेतले तर इंटक कामगार संघटना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे इंटक अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी सांगितले.