Wed, Nov 21, 2018 23:42होमपेज › Pune › पंतप्रधानांच्या आदेशानंतर महिलेला मिळाला न्याय !

पंतप्रधानांच्या आदेशानंतर महिलेला मिळाला न्याय !

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:03AMपुणे : प्रतिनिधी

मुंबईतील एका 65 वर्षीय महिलेने मुलाकडून होणार्‍या छळाचे गार्‍हाणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मांडले असून, पंतप्रधान कार्यालयाकडून छळाची गंभीर दखल घेतली गेली आणि तिच्या छळाला वाचा फुटली. तिला दुर्लक्षित करणार्‍या मुंबई पोलिसांकडून न्याय मिळणार का, हा सवाल आहे.

पेईंग गेस्ट म्हणून पुण्यात राहणार्‍या या महिलेने मोदींना पाच पानांचे पत्र पाठवले. आजच्या जगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी महिलांचा ‘सासूरवास’ कायम आहे. आपण न्याय द्याल, हा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. 

बांद्रा भागातील ही महिला दोन वर्षांपासून पुण्यात राहते. तिचे बांद्रा येथे घर आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवाहानंतर मुलगी पुण्यात आली. ती मुलासोबतच मुंबईत राहत होती. पतीच्या निधनानंतर मुलाचे लग्‍न झाले आणि तिच्या छळाला सुरुवात झाली. मुलाने तिचे घर नावावर करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. हा त्रास सहन न झाल्याने तिने मुलाला न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले.  मुलीकडे काही दिवस राहिली. त्यानंतर मात्र दोन वर्षांपासून काम करून आपली उपजीविका ती भागवत आहे.