Sun, Aug 25, 2019 12:43होमपेज › Pune › 65 स्वराज्यरथांचा शिवजन्मोत्सव सोहळा

65 स्वराज्यरथांचा शिवजन्मोत्सव सोहळा

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:13AMपुणे : प्रतिनिधी

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीदिनी सोमवारी (दि.19) सकाळी 9 वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या  मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा 6 वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 65 स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. मिरवणुकीचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक, आमदार शशिकांत शिंदे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त बसवराज तेली, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आमदार दिलीप मोहिते, दीपक मानकर, प्रदीप रावत, अरविंद शिंदे, सुनील मारणे यांसह असंख्य स्वराज्यबांधवांच्या हस्ते लालमहाल येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. 

मिरवणुकीत जिजाऊ शहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडू शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सूर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, 

श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार, पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे स्वराज्यरथ सहभागी होणार आहेत. 

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणार्‍या 51 रणरागिणींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिणी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. सोहळ्याचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दीपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र्र कंक, गिरीष गायकवाड, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, मयुरेश दळवी यांसह अनेक स्वराज्यबांधवांनी केले आहे.