Thu, May 23, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › सहा वर्षांच्या चिमुरडीचे रोजा व्रत

सहा वर्षांच्या चिमुरडीचे रोजा व्रत

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:20AMवडगाव मावळ : गणेश विनोदे

‘आसिया’ ही वडगाव शहरातील आत्तार परिवारातील 6 वर्षांची चिमुरडी. तिने संपूर्ण महिनाभर काटेकोरपणे रमजानचे उपवास पूर्ण करून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुस्लिम समाजामध्ये रमजान 

महिन्यामध्ये रोजा म्हणून ओळखले जाणारे व्रत असून, रमजान ईदपूर्वी एक महिनाभर हा उपवास केला जातो. पहाटे 4.30 पूर्वी आणि सायंकाळी 7.15 नंतर याच कालावधीत पूर्ण जेवण करण्याचा नियम उपवासकाळात पाळला जातो.

याशिवाय, संपूर्ण दिवसभर पाणीही प्यायचे नाही. त्यामुळे प्रामुख्याने मध्यमवयातील किंवा तरुणपिढीतील व्यक्ती हे उपवास करतात. साधारणत: 10 वर्षे वयानंतर हा उपवास केला जातो. परंतु, ‘आसिया’ मात्र याला अपवाद ठरली आहे. अवघ्या 6 वर्षांची ही चिमुरडी ज्युनिअर के. जी. मध्ये शिकत आहे.  वडील अमीर, आई रब्बाना आत्तार व आजी-आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेतून आसियाने उपवास करण्याचा मानस व्यक्त केला होता.

चिमुरडी हे उपवास कसे पूर्ण करणार याची काळजी कुटुंबीयांना होती. तरीही तिच्या या इच्छेला बळ देण्याचे काम कुटुंबीयांनी केले आणि आसियाने उपवास सुरू केले. ऐन उन्हाळ्यामध्ये दिवसभर पाणीही न पिता तिने उपवासाचे नियम कटाक्षाने पाळले. महिनाभर हा दिनक्रम पूर्ण होऊन अखेर आसियाची जिद्द आणि कुटुंबीयांचे बळ यामुळे तिचा हा धाडसी प्रयत्न यशस्वी झाला आहे.