Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Pune › सैयदनगर येथून 6 मुले बेपत्ता

सैयदनगर येथून 6 मुले बेपत्ता

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

हडपसरमधील सैयदनगर येथील मदरशातून एकाच वेळी सहा शाळकरी मुले बेपत्ता झाली आहेत. याप्रकरणी मदरशातील मौलाना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सहमद असार उद्दीन रजा (13, मूळ बिहार), अहसान निजाम शेख (15), शाहनवाज जमालुद्दीन शेख (16), अन्वारुल इसराउल हक (13), रिझवानआलम सलमुद्दीन शेख (15), अन्नान महंमद आजाद शेख (12)  अशी या मुलांची नावे आहेत. सर्व मुले परराज्यातील असून, ती सैयदनगर येथील ए. दारुल उलूम चिस्तीया जलालिया या मदरशात शिक्षणासाठी आली होती. 

ही मुले नवीन असल्याने त्यांच्यासोबत मौलाना नेहमी असतात. महंमदअबू तालीब शब्बीर आलम शेख (26, सैयदनगर) हे त्यांच्यासोबत होते. मंगळवारी मुले मदरशातून खेळण्यासाठी बाहेर गेली. त्यानंतर त्यांनी मौलाना यांच्याकडून लघुशंकेला जाण्याची परवानगी मागितली आणि ते मदरशामध्ये गेले. मात्र काही वेळाने मौलानांनी आत जाऊन पाहिले असता, ही मुले व त्यांचे सामान गायब होते.त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. ही मुले आढळल्यास वानवडी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. शिंदे करत आहेत.