Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Pune › पुणे : पाच किलो सोन्याची बिस्किटे चोरली

पुणे : पाच किलो सोन्याची बिस्किटे चोरली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

मुंबई झवेरी बाजार येथून आणलेले चार किलो ९०० ग्रॅम वजनाची दीड कोटी रुपयांची सोन्याची बिस्किट आणि ६० हजार रूपये रिक्षातील चोरट्यांनी चोरुन नेले. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियम जवळ  बुधवारी (28 मार्च) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी  कामगार  बेहराम पुरोहित  (३१, रा. पुणे) याने फिर्याद दिली असून तीन जणांविरूध्द गुन्हा दखल केला आहे.

पुण्यातील समृद्धी ज्वेलर्सचा कर्मचारी पुरोहित हा खासगी वाहनानं मुंबईहून बालेवाड़ी येथे आला. तेथून रिक्षाने पुण्यात जाण्यासाठी बसला. सोन्याचे दागिने घेऊन पुण्यातील टिंबर्स मार्केटच्या दिशेनं प्रवास करत होता. यादरम्यान, बालेवाडी येथे रिक्षातील चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून मोबाइल, रोख रक्क्म आणि खिशातील सोन्याची बिस्किट असा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार संबंधित कर्मचा-यानं पोलिसात दिली.
 

Tags : pune, pune news, gold biscuits


  •