Tue, May 21, 2019 00:20होमपेज › Pune › जेजुरी खंडेरायाच्या चरणी ५७ लाखांचे दान

जेजुरी खंडेरायाच्या चरणी ५७ लाखांचे दान

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:28AM

बुकमार्क करा
    जेजुरी : वार्ताहर

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी डिसेंबर महिन्यात विशेष गर्दी पाहण्यास मिळाली. डिसेंबर महिना हा सहलींचा काळ, तसेच नाताळ सुट्ट्यांमुळे या महिन्यात गडावर भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांच्या देणगीतून मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी दर्शनपास माध्यमातून 25 लक्ष 54 हजार रुपये, पावती दानातून 9 लक्ष 51 हजार, भक्त निवासमधून 2 लक्ष 57 हजार, मुख्य मंदिर दानपेटी 19 लक्ष 40 हजारांचे असे एकूण 57 लक्ष रुपयांचे उत्पन्न डिसेंबर महिन्यात देवसंस्थानकडे जमा झाले आहे.  

                                                                              
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबा मंदिर मुख्य गाभार्‍याच्या दानपेटीत अजूनही नोटबंदी केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळून येत आहेत. या नोटांचे करायचे काय, असा प्रश्‍न व्यवस्थापनाला पडला आहे. गुरुवारी (दि. 4) मुख्य मंदिरांसह इतर देवालयांतील दानपेट्या फोडून रकमेची मोजदाद करीत असताना नोटबंदी करण्यात आलेल्या  500 रुपयांच्या 12 नोटा व 1000 हजारांच्या 4 नोटा असे एकूण 10 हजार रुपये मिळून आले. भाविकांनी केलेले दान गुप्त असल्याने या नोटा नेमक्या कोणत्या भविकाने देवाला अर्पण केल्या ते समजू शकले नाही. दानपेटीतील रकमेची मोजदाद करताना मुख्य विश्‍वस्त राजकुमार लोढा व व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक कैलास महाले यांच्यासह इतर सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. मागील काळातही अशाच पाचशे रुपयांच्या बाद करण्यात आलेल्या नोटा आढळून आल्या आहेत.