Thu, Aug 22, 2019 04:53होमपेज › Pune › जिल्ह्यातील 516 अंगणवाडी सेविका होणार निवृत्त

जिल्ह्यातील 516 अंगणवाडी सेविका होणार निवृत्त

Published On: Mar 06 2018 2:02AM | Last Updated: Mar 06 2018 2:02AMपुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना प्राथमिक पूर्व शिक्षण देणार्‍या परंतु, 60 वर्षे पूर्ण झालेल्या 516 मदतनीस आणि सेविकांना निवृत्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 1 एप्रिल 2018 ला वयाची 60 वर्षे अथवा जास्त सेवा पूर्ण झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्त करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 21 प्रकल्पांतर्गत 3 लाख 10 हजार बालकांना अंगणवाडी सेविकांद्वारे प्राथमिक पूर्व शिक्षण दिले जाते. जिल्ह्यात एकूण 4 हजार 100 अंगणवाडी सेविका असून, मदतनिसांची आकडेवारी 4 हजार 34 आहे, तर मिनी अंगणवाडीच्या 438 सेविका कार्यरत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविकांची आकडेवारी 322 आहे, तर मदतनिसांची संख्या 194 आहे. मिळून 516 अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची  सेवानिवृती केली जाणार आहे. सेविका आणि मदतनिसांची निवृत्त होणार्‍या आकडेवारीत खेड तालुक्यातील सर्वाधिक 99 जणींचा समावेश आहे, तर आंबेगाव 36, बारामती 76, भोर 25, दौंड 21, हवेली 48, उरुळीकांचन 8, इंदापूर 42, जुन्नर 47, नारायणगाव 19, मंचर 23, मावळ 14, मुळशी 7, पुरंदर 24, शिरूर 26 आणि वेल्हेतील एका सेविकेचा समावेश आहे.