Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Pune › एका अपत्यावर कुटुंब नियोजन करणार्‍या कर्मचार्‍यास ५० हजार

एका अपत्यावर कुटुंब नियोजन करणार्‍या कर्मचार्‍यास ५० हजार

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

एका अपत्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दोन जादा वेतनवाढी देण्यापेक्षा एकदाच बक्षिस म्हणून 50 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यावर मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. 

कुंटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत एकाच मुलीवर शस्त्रक्रीया करणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांसाठी पालिकेच्या समाज विकास विभागातर्फे लाडकी लेक दत्तक योजना राबविली जात होती. या योजनेंतर्गत संबंधीत कर्मचार्‍यास जादा दोन वेतनवाढी दिल्या जात होत्या.

या वेतनवाढी न देता त्यांना एकाचवेळी बक्षिस म्हणून 50 हजार रुपये मुलीच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आणि एका अपत्यावर कुटुंब नियोजन करून शस्त्रक्रीया करणार्‍या पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही दोन जादा वेतनवाढी न देता एकदाच 50 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर दिला आहे. त्याच्यावर स्थायीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.