Thu, Jan 24, 2019 04:03होमपेज › Pune › रेल्वेच्या खानपान सेवेवर ५ टक्के ‘जीएसटी’

रेल्वेच्या खानपान सेवेवर ५ टक्के ‘जीएसटी’

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:02AMपुणे :  प्रतिनिधी

रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थ विकत घेतल्यास किंवा रेल्वेतील खानपान सेवा घेतल्यास यापुढे 5 टक्के जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू होणार आहे. अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी (दि. 6) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे जाहीर केले असून रेल्वेमध्ये किंवा स्टेशनवर 5 टक्क्यांहून अधिक जीएसटी लावणार्‍या विक्रेत्यांना यापुढे चाप बसणार आहे. दरम्यान, प्रवाशांकडून 5 टक्क्यांहून अधिक जीएसटी दर आकारल्यास संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे त्याचा परवाना जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नुकतेच डेक्कन क्वीनमधील एका प्रवाशाकडून 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. याबाबत त्या प्रवाशाने स्टेशन मास्तरकडे तक्रार नोंदविली होती. अर्थमंत्र्यांनी रेल्वे बोर्डाला दि. 31 मार्च रोजी पत्र लिहिले होते, ज्यामध्ये जीएसटी 5 टक्केच घेण्यात यावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. 

प्रवाशांमध्ये अधिक गोंधळ होऊ नये याकरिता जीएसटीचा दर निश्‍चित केला गेला असून प्रवाशांनी 5 टक्क्यापेक्षा अधिक जीएसटी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आयआरसीटीसी (इंडियन रेल्वेज केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड) किंवा त्यांच्या परवानाधारक विक्रेत्यांना याबाबत आदेश देण्यात आले असून पुणे स्टेशनसह देशभरातील सर्व स्टेशन व रेल्वेमध्ये याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे सांगण्यात आले आहे.

 

Tags : pune, pune news, railway, railway catering service, GST,