Thu, Jan 24, 2019 03:34होमपेज › Pune › पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार

Published On: Feb 03 2018 10:30PM | Last Updated: Feb 03 2018 10:36PMपुणे : प्रतिनिधी

पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा येथे कार व टेम्‍पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झाले असून तिघेजण जखमी आहेत. मृतांमध्ये ४ महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आज, शनिवारी रात्री ९ वाजता हा अपघात झाला. 

लोणावळा शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वळणावर कारला (क्र.एमएच ०४, डी.वाय. ६३४६) भरधाव टेम्‍पोने (क्र.एम.एच. ०९ बी.सी. ८२७८) जोराची धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. टेम्‍पोचालकही जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील स्‍पर्श या खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघात ग्रस्त कारमध्ये बसलेले सर्वजण लोणावळ्यातील रिदम या हॉटेलचे कर्मचारी असून सर्व जण काम संपवून घरी निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.