होमपेज › Pune › नक्षलवाद्यांच्या पैशाने 'एल्‍गार' : पुणे पोलिस

नक्षलवाद्यांच्या पैशाने 'एल्‍गार' : पुणे पोलिस

Published On: Jun 07 2018 2:18PM | Last Updated: Jun 07 2018 2:36PMपुणे : प्रतिनिधी 

एल्गार परिषदेला माओवादी संघटनेकडून फंडिंग मिळाल्याचा ठोस पुरावा मिळाला असून अटक केलेल्या पाच जणांचे थेट सीपीआय माओवादी या युएपीए अंतर्गत बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध आहेत. तर सुधीर ढवळे हे एल्गार परिषदेआधी माओवादी कॉमरेड मंगलू व दिपू  यांच्या संपर्कात होते. असे सहआयुक्त रविंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

विश्रामबाग पोलिस ठाण्यात ८ जानेवारी रोजी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. रा गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हा दाखल केलेल्यांचे संबंध थेट नक्षलवाद्यांशी आढळून आल्याने त्यांच्या घरांवर १७ एप्रिल रोजी धाडी टाकल्या. त्यावेळी त्यांच्याकडे माओवाद्यांशी संबंधित साहित्य आढळून आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. रोना विल्सन हा सीपीआय माओवादी संघटनेचा पुर्णवेळ कार्यकर्ता आहे. रोना विल्सन आणि गडलिंग या दोघांच्या संगणकाच्या हार्डडिस्क फॉरेन्सिक क्लोनिंग करून ताब्यात घेतल्या होत्या. त्याची छाननी केल्यावर दोघांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघांचे संबंध सुधीर ढवळे याच्याशी आले. सुधीर ढवळे याच्यासोबतच शोमा सेन, महेश राऊत यांचा एल्गार आयोजनात सहभाग होता.त्यांचा घनिष्ठ संबंध माओवाद्यांशी आल्याने या गुन्ह्यात 'युएपीए'च्या कलमांची वाढ करण्यात आली आणि सर्वांना यानुसारच अटक केली गेली.असेही ते पुढे म्हणाले. 

या पाचही जणांचा प्रतिबंधीत संघटनेशी संबंध तर आलाच मात्र, एल्गार परिषदेला माओवाद्यांनी फंडींग केल्याचे ठोस पुरावे मिळाले. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर रोना विल्सन याला भूमीगत  माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने लिहीलेल्या पत्रात डॉ. प्रकाश आंबेडकर व कॉंग्रेसचा उल्लेख आढळला आहे. तर माओवाद्यांचे कॉमरेड मंगलू व दिपू हे एल्गार परिषदेच्या आधी सुधीर ढवळेशी संपर्कात होते. 

कोरेगाव भीमा हिंसाचार हा एल्गार परिषदेमुळे झाला का याचा तपास सुरु आहे. सीपीआय माओवादी या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. एल्गार परिषद ही माओवादी विचारसरणी पसरविण्यासाठीच्या  रणनीतीचा भाग असू शकते.