Thu, Aug 22, 2019 12:32होमपेज › Pune › पुणे : मनपा न्यायालयात ४८० प्रकरणांचा निपटारा

पुणे : मनपा न्यायालयात ४८० प्रकरणांचा निपटारा

Published On: Sep 08 2018 12:56PM | Last Updated: Sep 08 2018 12:56PMपुणे : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबीत असलेले दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी लोक अदालत सुरु करण्यात आले आहे. आज पुणे महानगरपालीका येथील न्यायालयात झालेल्या लोक अदालतीत जवळपास ४८० प्रलंबीत असलेली प्रकरणे निकाली काढण्यात आली. 

आज निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे खटले होते, त्यात प्रामुख्याने सदनिका गळती, पाण्याचा गैरवापर, ओला व सुका कचरा विभाजन न करणे, पदपथ व मनपाच्या जागेत अतिक्रमण करणे, मिळकत कर, पाणी पट्टी वेळेत न भरणे,  कचऱ्याची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने अशा असंख्य दाव्यांची सुनावणी घेत दंड करुन तडजोडीने ही प्रकरणे निकाली काढण्यात आली. 

न्यायालयाने थकबाकीदार असलेल्या नागरीक व व्यावसाईकांना त्यांच्या देयकां मध्ये सुट देउन मनपाला महसुल मिळवुन दिला. न्यायालयाने निर्देशीत केल्याप्रमाणे आजचे कामकाज न्यायाधीश वृशाली कोरे, सदस्य अनुराग नेवसे व मनपाच्या विधि अधिकारी  मंजुशा ईधाटे यांनी काम पाहीले.