Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Pune › ४१ नवीन रेशन दुकाने मंजूर

४१ नवीन रेशन दुकाने मंजूर

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:57PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 11 विधानसभा मतदारसंघात 80 नवीन रेशन दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अटी व शर्ती पूर्ण करणार्‍या 41 अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पुढील एक ते दोन महिन्यांत या नवीन दुकानांतून धान्य विक्रीला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रभारी पुरवठा अधिकारी रघुनाथ पोटो यांनी दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 11 विधानसभा मतदारसंघनिहाय परिमंडल कार्यालयाअंतर्गत 923 रेशन दुकानांतून धान्याचे वाटप केले जात आहे. वाढती लोकसंख्या पाहता 3 नोव्हेंबर 2007 च्या आदेशान्वये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतीत 80 नवीन रेशन दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्ज हे महिला किंवा महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले. परिमंडल व खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 1, परिमंडल ई  वडगाव शेरी 88, परिमंडल क शिवाजीनगर 7, परिमंडल ब कॅन्टोन्मेंट 7 आणि  कोथरूड ल परिमंडलातून 11 अर्ज दाखल झाले होते.

80 रेशन दुकानांसाठी 160 बचत गट आणि महिलांनी अर्ज केले होते. प्राप्त अर्जांची पुरवठा विभागाने पडताळणी केली. अटी व शर्तीची पूर्तता करणर्‍या ब परिमंडलात 5, ई 17, ग 2, क 12, ल 3 आणि म परिमंडलात 1 अशी एकूण 41 दुकाने मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर रेशन दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून ज्या ठिकाणी रेशन दुकान सुरू करायचे आहे, त्या ठिकाणांची पुरवठा विभागाचे अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यानंतर अनामत रक्कम भरल्यानंतर धान्य वाटपास सुरुवात होणार असल्याची माहिती पुरवठा अधिकार्‍यांनी दिली.