Mon, Jun 01, 2020 03:57होमपेज › Pune › 'तबलीगी'च्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ४० जण सापडले

'तबलीगी'च्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ४० जण सापडले

Last Updated: Apr 01 2020 1:20AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

दिल्ली येथे  पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सहभागी झालेले आतापर्यंत चाळीस लोक पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड,  पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा  समावेश आहे.

तबलीगी जमातच्या कार्यक्रमात देशभरातील विविध नागरिक सहभागी झाले होते. त्यातील काहीजणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कार्यक्रमासाठी देश विदेशातील नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांनी देखील पुण्यातील नागरिक सहभागी झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  १३६ नागरिकांची  पोलिसांना मिळाली होती.  त्यातील काहीजणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे.  तर इतर लोकांचा पोलिस शोध घेत आहेत.