Tue, Jul 23, 2019 17:32होमपेज › Pune › एटीएम कार्डद्वारे पावणेचार लाखांची चोरी 

एटीएम कार्डद्वारे पावणेचार लाखांची चोरी 

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 11:24PMतळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

भाडोत्री कारच्या चालकाने निवृत्त लष्करी अधिकारी यांचे  एटीएम कार्ड चोरून 3 लाखांचे  दागिने व 70 हजार रुपये रोख  चोरल्याचे निष्पन्न झाले असून चोरट्यास तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

विलास निर्मळे (36 रा. बोरगाव ता. माळशिरस.जि.सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  याबाबत फिर्याद निवृत्त  अधिकारी अरुण देशमुख (79 रा.  यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर लष्करी अधिकारी देशमुख हे तळेगावात वास्तव्यास असून त्यांना बाहेर जाण्यासाठी जर गाडी लागली तर ते आरोपी निर्मळे याला वेळोवेळी बोलावून घेत असत. त्यामुळे एकामेकांमध्ये जवळीक आणि न विश्वास निर्माण झाला होता. देशमुख यांच्या एक्सीस बँकेच्या एटीएम कार्ड मधून दि.26 एप्रिल रोजी 3लाखांचे दागिने आणि 70 हजार  रोख काढल्याचा संदेश देशमुख यांना मोबाईल वर आला. त्यावेळी त्यांनी एटीएम कार्ड शोधले असता ते गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.