Tue, Nov 20, 2018 23:07होमपेज › Pune › सराफी दुकानावर दरोडा प्रकरणी चार जण ताब्यात

सराफी दुकानावर दरोडा प्रकरणी चार जण ताब्यात

Published On: Feb 22 2018 8:33AM | Last Updated: Feb 22 2018 8:33AMपुणे : प्रतिनिधी 

रविवार पेठेतील सराफी दुकानावर भरदिवसा टाकलेल्या दरोडय़ाचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने चार दरोडेखोरांना वापी येथून ताब्यात घेतले आहे. हे चारही जण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

मनीष स्वार, मनोज बुगडी, प्रकाश खडका, देवेंद्र बहादूर अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. रविवार पेठेतील पायल गोल्ड या सराफी दुकानात दरोडा टाकून 700 ग्राम सोने व 30 हजार रुपये व मोबाईल लुटून नेला होता. भरदिवसा ही घटना घडली होती.  या दुकानाच्या शेजारील दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते. गुन्ह्याचे स्वरुप पाहता चोरट्यांनी अगोदर रेकी करुन हा दरोडा टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे़ दरम्यान, पोलिसांना हा दरोडा टाकणाºयांची नावे निष्पन्न झाली झाली होती त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. दरम्यान गुन्हे शाखेच्या  पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हे चारही जण रेल्वेने नेपाळ येथे पळून जाणार होते. त्यावेळी चौघांना पथकाने वापी येथून ताब्यात घेतले आहे.