होमपेज › Pune › राज्यातील ३६ रेल्वे स्थानके स्वच्छ; पुण्याचा अ-१ श्रेणीत समावेश 

राज्यातील ३६ रेल्वे स्थानके स्वच्छ; पुण्याचा अ-१ श्रेणीत समावेश 

Published On: Aug 13 2018 8:19PM | Last Updated: Aug 13 2018 8:19PMपुणे : प्रतिनिधी

देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला असून महाराष्ट्रातील  ३६ रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. श्रेणी 'अ १' मध्ये  वांद्रे रेल्वे स्थानकाने ७ वा क्रमांक पटकावत देशात पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे.

या अहवालात देशातील एकूण ७५ रेल्वे स्थानकांची अ-१ श्रेणी मध्ये निवड करण्यात आली. यामध्ये  पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानाकाने ७ वा क्रमांक मिळवून पहिल्या १० मध्ये जागा पटकाविली आहे.  मुंबई सीएसटी, पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.

देशातील एकूण ३३२ रेल्वे स्थानकांची निवड ‘अ‘श्रेणी मध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रातील २६ रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुडुर्वाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज, सांगली, लातूर, शिर्डी, चंद्रूपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

गुणांकणात सुधार झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणी 'अ १‘ मध्ये मुंबई-सीएसटी स्थानकाने ६ व्या तर दादर रेल्वे स्थानकाने १० व्या क्रमांकावर झेप घेतली  आहे.स्वच्छ  रेल्वे स्थानकांच्या अहवालात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एकूण ८ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात ‘अ १‘श्रेणी मध्ये वांद्रे, मुंबई सीएसटी, मुंबई सेंट्रल, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस‍, दादर आणि कल्याण या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर ‘अ‘ श्रेणीत पनेवल रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत‘अहवालांतर्गत देशातील ४०७ रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली. यात श्रेणी ‘अ-१ ‘ मध्ये एकूण ७५ रेल्वे स्थानकांत  महाराष्ट्रातील १० रेल्वे स्थानकांचा तर, श्रेणी 'अ' मध्ये एकूण ३३२ रेल्वे स्थानकांत राज्यातील २६ अशा एकूण 36 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. दोन्ही श्रेणींमध्ये गुणांकणात सुधार झालेल्या सर्वोत्तम १० रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली असून ‘अ-१‘ श्रेणीत मुंबई-सीएसटी स्थानकाने ९ वा तर  दादर रेल्वे स्थानकाने १० क्रमांक पटकावला आहे.
 रेल्वे मंत्रालयाच्यावतीने २०१६ पासून ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत‘ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येते. यावषीर्ही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन श्रेणींमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वषार्काठी 50 कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना 'अ-१‘  श्रेणी मध्ये तर ६ ते ५० कोटीं प्रवाशी प्रवास करणाºया रेल्वे स्थानकांना 'अ' श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह,स्थानकावर खुल्या ठिकाणची आसन व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी आदी बाबींचे सर्वेक्षण होऊन या रेल्वे स्थानकांचे मानांकन ठरविण्यात आले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे.