Wed, Jul 17, 2019 00:39होमपेज › Pune › भांडवली कामांवर झाला ३५ टक्के खर्च

भांडवली कामांवर झाला ३५ टक्के खर्च

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:22PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017-2018 या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत भांडवली कामांवर 34.79 टक्के रक्कम खर्च झाली आहे.

गेल्या दोन आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत विकासकामांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास आपण राष्ट्रवादीवर मात केल्याचा दावा भाजपने केला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना 2015-16 या आर्थिक वर्षांमध्ये 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या आठ महिन्यांत विकासकामांवर अर्थसंकल्पातील तरतूद रकमेपैकी 29.23 टक्के रक्कम खर्च झाली होते. सन 2016-17  या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत विकासकामांवर अवघे 16.84 टक्के  रक्कम खर्च झाली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली.

महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 5 हजार 150 कोटी 87 लाखांचा आहे. त्यामध्ये ‘जेएनएनयूआरएम’ व केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या योजनांचाही समावेश आहे. या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी तरतूद एकूण रकमेपैकी गेल्या आठ महिन्यांत 34.79 टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे, असा भाजपने केला आहे.