Sun, Mar 24, 2019 23:32
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ ३४ ठिकाणी

‘पब्लिक सायकल शेअरिंग’ ३४ ठिकाणी

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:36PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश होऊन पावणेदोन वर्षे उलटल्यानंतर ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ हा पहिला उपक्रम रविवारी (दि.26) सुरू करण्यात आला. या योजनेत स्मार्ट सिटी लिमिटेडची एका पैशाचीही गुंतवणूक नाही, हे विशेष.

नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा त्या अभियानात तिसर्‍या टप्प्यात समावेश केला गेला. त्याची घोषणा तत्कालिन केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी पुण्यात 24 डिसेंबर 2016 ला झालेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केली होती. त्याबाबत महापालिकेने राज्य शासनच्या शिफारशीने केंद्राकडे 31 मार्च 2017 ला स्मार्ट सिटीचा ‘डीपीआर’ सादर केला होता. 

स्मार्ट सिटीत समावेश होऊन पावणेदोन वर्षे झाल्यानंतर ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम स्मार्ट सिटी कंपनीने राबविला आहे. त्यामध्ये पालिकेची ‘शून्य’ गुंतवणूक आहे. प्रायोगिक तत्त्वावर इलू बाइक्स कंपनीच्या वतीने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. कंपनीने एकूण 300 सायकली दिल्या आहेत. त्या 34 ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अर्ध्या तासाला 5 रुपये भाडे आहे. इलू (वाययुएलयु) कंपनीचे मोबाईल अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करून हे भाडे ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी सायकलस्वारांच्या मोबाईलमध्ये सदर कंपनीचे अ‍ॅप असणे आवश्यक आहे, अन्यथा सायकलचा वापर करता येणार नाही. 

या उपक्रम 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याला मिळणार प्रतिसाद पाहून ओफो, मोबिक, पॅडेल या उर्वरित 3 कंपन्यांच्या सहकार्याने हा उपक्रम इतर ठिकाणी राबविण्यात येणार आहे. 

पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरातील सायकलची 34 ठिकाणी

पिंपळे सौदागर व्दारकादेश सोसायटी, साई आंगण होम्स, कुणाल आयकॉन समोर, कुंजीर गार्डन, ऍल्कोव्ह सोसायटी गेटसमोर, कुंजीर मैदान,  फॅब इंडिया, कुणाल आयकॉन रोड, गुरुकुल सोसायटी इन्ट्रीगेट, साई गार्डन, गोविंद यशदा चौक बीआरटीएस, पी.के. चौक  बीआरटी, निसर्ग निर्मीती सोसायटी बीआरटी, रिलायन्स फ्रेश, रहाटणी रोड राधिका शॉप, शिवाजी पुतळा चौक, महादेव मंदीर, क्रीमेटुरीयेम वॉल, आरक्षित क्रमांक 361 उद्यान, काटे पुरम चौक बीआरटी,  पिंपळे गुरव जवळकर चौक बीआरटी, कल्पतरु सोसायटी, सेव्ह ट्री चौक, तुळजा भवानी मंदीर, डायनोसॉर गार्डन सीमाभिंत, दापोडी रस्ता  महाराष्ट्र बँक, शिव गणेश चौक,  शिरोडे रोड ब्ल्यू डार्ट ऑफीस, बंटी चौक हरीओम मार्केटजवळ, काटेपूरम चौक कुंदन सुपर मार्केट, काटेपूरम  फेज 2,  काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल, रामकृष्ण मंगल कार्यायल चौक दक्षिण बाजू,  दापोडी रस्ता आरक्षण क्रमांक 347, गायत्री मेडीकल स्टोअर दापोडी रस्ता, नीलम सुपर मार्केट.