Tue, Jun 18, 2019 20:24होमपेज › Pune › ३३ हजार गावांत ऑनलाईन सातबारा 

३३ हजार गावांत ऑनलाईन सातबारा 

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:47AMपुणे : समीर सय्यद

तलाठ्यांच्या डिजिटल सहीसह सातबारा घरबसल्या ऑनलाईन मिळावा, यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाला अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 31 मार्चपर्यंत सातबारा ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दि.23 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 43,949 गावांपैकी 33,161 गावांतील (76 टक्के) सातबारा ऑनलाईन झाला आहे. 

खातेदारांना 7/12 मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, 2002 पासून राज्यात 7/12 संगणकीकृत करण्यात आला. परंतु त्यात मोठ्याप्रमाणात चुका झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकर्‍यांना अचूक संगणकीकृत 7/12 देण्यासाठी केंद्र पुरस्कृत ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम’ राज्यात कार्यान्वित करण्यात आला. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली. त्याआधारे राज्यात ई-फेरफार करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार केल्या जात आहेत. राज्यातील महसूल यंत्रणेला 7/12चा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत 7/12 व 8 अ साठी 24 मुद्यांवर तपासणी केली जात आहे.

राज्यात हे काम सुरू असून सुमारे 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे अनेकवेळा काम रखडत होते. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक सर्व्हरचा वापर केला जात आहे. तसेच 31 मार्च पूर्वी सर्व 43 हजार 949 गावांतील सातबारा ऑनलाईन करायचे उद्दिष्ट आहे.   - रामदास जगताप, ई-फेरफारचे राज्य समन्वयक