पुणे : प्रतिनिधी
स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे विभाजन होणार आहे. त्यानंतर पुणे आयुक्तालयामध्ये 32 पोलिस ठाणी असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काही नवीन पोलिस ठाणी निर्माण करण्याबरोबरच पुणे ग्रामीणच्या हद्दीतील काही पोलिस ठाण्यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे; तसेच पुणे शहराचे पूर्व व पश्चिम असे दोन विभाग करण्यात येणार आहेत.
स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती सध्या प्रतीक्षेत आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून शहरात 39 पोलिस ठाणी आहेत.पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलिस आयुक्तालयात 32 पोलिस स्टेशन राहणार आहेत.यामध्ये ग्रामीण पोलिस दलातील लोणी काळभोर आणि लोणीकंद पोलिस परिसरांचा समावेश करून दोन पोलिस ठाण्यांचा समावेश शहरात करण्यात येणार आहे, तर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या प्रमुखपदी विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक केली जाणार आहे.
विभाजनानंतर असे असेल पुणे शहर आयुक्तालय
पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त, दोन अपर पोलिस आयुक्त, चार पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस उपायुक्त असतील. पुणे शहर आयुक्तालयाचा कारभार पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात चालणार आहे, तर चार परिमंडळे असणार आहेत, तर प्रत्येक विभागात दोन परिमंडळे असणार आहेत. पूर्व विभागात परिमंडळ तीन आणि चार असून, दोन पोलिस आयुक्त आणि चार सहायक आयुक्त असणार आहेत, तर पश्चिम विभागात एक व दोन परिमंडळ असणार आहे. तेथेही दोन उपायुक्त आणि चार सहायक आयुक्त असणार आहेत.
Tags : Pune, Pune News, 32, new, police stations, pune
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM