Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Pune › जन्म-मृत्यू डेटा एन्ट्री संस्थेला ३ महिने मुदतवाढ  

जन्म-मृत्यू डेटा एन्ट्री संस्थेला ३ महिने मुदतवाढ  

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:49AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंदीची डेटा एंट्री करणे आणि दाखले वितरित करणार्‍या साई एंटरप्रायजेस संस्थेच्या कामकाजाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंगळवारी (दि.26) मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंद घेणे व त्याचे दाखले वितरित करण्याचे काम दहा उपनिबंधकांमार्फत आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), भोसरी रुग्णालय, जिजामाता, सांगवी, आकुर्डी,  तालेरा रुग्णालय, फुगेवाडी दवाखाना, प्राधिकरण दवाखाना आणि पिंपरीगाव दवाखाना येथे सुरू आहे. या कामासाठी निविदा मागवून सर्वांत कमी दराची निविदा सादर करणार्‍या साई एंटरप्राईजेसला हे काम दिले होते. या कामासाठी महापालिकेतर्फे संगणक, प्रिंटरची व्यवस्था करण्यात येते, तर लागणारी स्टेशनरी, कार्टेज, कामगार आणि अन्य आवश्यक साहित्य हे ठेकेदारांतर्फे  पुरविण्यात येते.

मराठी डेटा एंट्री 3 रुपये 10 पैसे, तर इंग्रजी डेटा एंट्री 2  रुपये 90 पैसे आणि 12 रुपये प्रति संगणक दाखला या दराने संबंधित संस्थेला 5 वर्षांच्या कालावधीसाठी हे काम देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे मंजुरी दिली होती. त्याची मुदत 31 डिसेंबर 2017 ला संपणार आहे. 

नवीन संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे साई एंटरप्राईजेस या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली.