Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Pune › महिलेची तीन लाखांची फसवणूक

महिलेची तीन लाखांची फसवणूक

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:08AM

बुकमार्क करा
पुणे/ वाघोली : प्रतिनिधी 

प्लॉटिंगमधील जागेच्या व्यवहारात महिलेकडून तीन लाख रुपये घेऊन जमीन न देता तसेच पैसे परत देण्यास नकार देत फसवणूक करणार्‍या एका एजंटावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अतिष दिलीपराव देशमुख (रा. लोहगाव रोड)  असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटाचे नाव आहे. नलिनी सोळंकी (रा. पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नलिनी सोळंकी यांनी 2016 मध्ये देशमुख यांच्या मध्यस्थीने आव्हाळवाडी रस्त्यालगतच्या चिंतामणी पार्क प्लॉटिंगमध्ये जागा पाहिली. जागा पसंत पडल्यानंतर आठ लाख रुपयांना जागेचा व्यवहार ठरला. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी सोळंकी यांनी देशमुखला वेळोवेळी तीन लाख रुपये दिले. मात्र देशमुख याने या जागेचा पुढील कोणताही व्यवहार केला नाही. त्यानंतर सोळंकी यांनी पैशांची मागणी केली. त्या वेळी देशमुख यांनी पैसे व जागा दोन्हीही देण्यास नकार दिला. त्यानंतर सोळंकी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.